श्रीनगरजवळ अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
बेळगाव : औषधे घेऊन बेंगळूरकडे जाणारा कँटर दुभाजकाला आदळल्याने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील श्रीनगरजवळ सोमवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात कँटरचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. केए 52, बी 7247 क्रमांकाचा कँटर हुबळीच्या दिशेने जात होता. समोरचा टायर फुटून श्रीनगर पुलावरील दुभाजकाला कँटर आदळला. सोमवारी दुपारी 2 वाजता ही घटना घडली असून घटनेची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.