Tarun Bharat

टीम इंडियाला आणखी एक धक्का; कर्णधार राेहित शर्मा काेराेना पॉझिटिव्ह

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाचवी आणि निर्णायक टेस्ट आता आठवडाभरावर आली आहे. त्याचवेळी भारतीय टीमला मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाली आहे. भारतीय संघास (indian cricket team) येत्या १ जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या (England) कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. जो गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झाला नव्हता. यंदा देखील बहुतांश खेळाडू काेराेना संक्रमित हाेऊ लागल्याने हा सामना धोक्यात आला आहे.

रोहित शर्मा याची शनिवारी त्याची रॅपीड अँटीजन टेस्ट झाली. त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवूव आहे. शनिवारी झालेल्या सराव सामन्यात रोहित शर्माने फलंदाजीस आला नाही. त्याचे नेमके कारण कोणालाच समजले नाही. सध्या रोहित फॉर्ममध्ये नसताना ताे सराव सामन्यासाठी आला नाही म्हणून क्रिकेटजगतात चर्चा झाली. दरम्यान रात्री उशिरा त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आल्याने चर्चेस पूर्ण विराम मिळाला.

Related Stories

ऑलिंपिकसाठी चीनने शिवेनला एकेरीतून वगळले

Patil_p

माजी अष्टपैलू यशपाल शर्मा काळाच्या पडद्याआड

Patil_p

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Abhijeet Shinde

दिल्ली कॅपिटल्सची अंतिम फेरीत धडक

Patil_p

सराव शिबिरासाठी धोनी चेन्नईत दाखल

Amit Kulkarni

क्लिस्टर्सचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त

Patil_p
error: Content is protected !!