प्रतिनिधी /पेडणे
राष्ट्रीय महामार्गाने मालपे हायवेवरून म्हापसा मार्गे पुण्याच्या दिशेने जाणारी एक मारुती आर्टिका गाडी मालपे येथे एका बाजूने रस्ता बंद केल्याने चालकाच्या अंदाज न आल्याने रस्त्याच्या बाजूला खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पेडणे अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले. खूप प्रयत्न करुन गाडी जवानानी बाहेर काढली.
पेडणे आग्निशामक दलाचे जवान सब ऑफिसर सुनील देसाई, हवालदार विठ्ठल परब, फायर फायटर शाम आरोंदेकर, अमित सावळ यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने आणि पेडणे पालिकेच्या कामगाराच्या सहकार्याने गाडी बाहेर काढली.
अपघात झाल्याने गाडीचे नुकसान झाले. मात्र गाडीतील कोणालाही इजा झाली नाही. एकेरी रस्ता बंद ठेवून वाहतूक वळविल्याचे कोणत्याही प्राकारचे दिशा दर्शक फलक तथा सूचना त्या ठिकाणी नसाल्याने हा अपघात झाला आहे. संबंधित खात्याने राष्ट्रीय महामार्गावर दिशा दर्शक फलक लावावे अशी मागणी या पारिसरातील नागरिकांनी केली आहे.