Car accident on Banda-Danoli district road –
बांदा – दाणोली जिल्हामार्गावर विलवडे चव्हाटवाडी येथे 11 वाजता WB 18 AF 3010 ह्यारीअर या कारला अपघात झाला . गाडीत एक महिला व दोन पुरुष होते. हि गाडी फणसाच्या झाडावर आदळली. त्यामुळे गाडीचे नुकसान झाले. एअर बॅग ओपन झाल्याने गाडीतील कोणालाही दुखापत झाली नाही . चालकाला डुलकी लागल्यामुळे फणसाच्या झाडावर आदळून हा अपघात झाला.
ओटवणे / प्रतिनिधी