Tarun Bharat

देवदर्शनासाठी जाणाऱ्या इंगळीतील कुटुंबाच्या गाडीला कर्नाटकात अपघात ; एक महिला ठार

इचलकरंजी / प्रतिनिधी


Kolhapur News : इंगळी ( ता. हातकणगंले) येथून देवदर्शनासाठी एका कुटुंबाच्या चार चाकी गाडीचा मुंडगुड ( जि.कारवार, कर्नाटक राज्य ) नजीक भीषण अपघात झाला. यामध्ये एक महिला जागीच ठार झाली. रुपाली विद्यासागर गुदले असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघाताने इंगळी गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबतची समजलेली माहिती अशी, इंगळी येथे विद्यासागर गुदले आपल्या कुटुंबासह राहत असून, ते जिल्ह्यातील एका साखर कारखान्यात नोकरी करीत आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी चार चाकी गाडी खरेदी केली आहे. या गाडीमधून ते त्यांची पत्नी, मुलगा आणि नातेवाईक असे मिळून कर्नाटक राज्यातील हुमच्या येथील पद्मावती देवीच्या दर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांची गाडी मुंडगुड ( जि.कारवार, कर्नाटक राज्य ) नजीकच्या एका वळणवर पलटी झाली.

यावेळी गाडीचा दरवाजा निखळला गेल्याने दरवाजाशेजारी बसलेल्या रुपाली गुदले हि महिला गाडीतून बाहेर फेकल्या जावून झाडावर जावून आदळल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारा करीता नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला. तर गाडीतील अन्य व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. या अपघाताने इंगळी गावावर शोककळा पसरली आहे.

Related Stories

सॅटेलाईट फोटोमुळे चीनचा खोटेपणा उघड

datta jadhav

FIFA विश्वचषक 2022 : जपानचा जर्मनीला धक्का; 2-1 ने विजय

Abhijeet Khandekar

युपी : आंतरराष्ट्रीय शूटर दादी चंद्रो तोमर यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

फुटीच्या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

Archana Banage

“भित्र्या सेलिब्रिटींनो, कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा ?”

Archana Banage

कोल्हापूर : ‘ओएलएक्स’च्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक

Archana Banage