Tarun Bharat

बारावीनंतर करिअर निवडतायं, ‘या’ बेसिक गोष्टीची होईल मदत; वाचा सविस्तर

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

आज बारावीचा निकाल जाहीर झाला. आता अनेकांचे विचारचक्र सुरु झाले असेल. आता पुढे काय करायचे याच टेंशन विद्यार्थ्यांपेक्षा आई-वडिलांना आले असेल. कारण ही तसेच आहे बाजारातील अनेक जाहिरातींचा मारा यामुळे नेमके काय करावे हे सूचत नाही. अशावेळी अनेकांचे सल्ले समोर येण्यास सुरवात होते. यातुन आपण अजून कन्फ्यूज होतो. विरिष्ठांनी सांगितले म्हणून किंवा मित्राने तो पर्याय निवडला म्हणून मग आपण ही त्यामागे जायचं अस अनेकदा होते. कालांतराने नैराश्य यायला सुरु होत. याचा परिणाम आपल करिअरही होत नाही आणि बस, चल रही है जिंदगी अस म्हणण्याची वेळ येते. आपल्यासोबत अस होऊ नये म्हणून करिअरसारखा महत्त्वाचा निर्णय घेताना आधी आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. मला खरंच काय बनायचं आहे, माझी खरी आवड काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उजळणी आधी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होईल. आणि आपण नैराशाच्या गर्तेत अडकणार नाही. यासाठी काही बेसिक पण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. तसेच करिअर निवडताना तुम्ही कोणते पर्याय निवडू शकता हे देखील पाहूया.


स्वत:ला ओळखा
आपण जेव्हा शाळेत जायला लागतो तेव्हा शाळेतील शिक्षक, आई-वडील काय सांगतात तसंच आपण शिकत असतो. मात्र जेव्हा करिअर निवडायचा पर्याय समोर येतो अशावेळी तुम्ही तुम्हाला काय करायचे आहे हे आधीच ठरवा. यासाठी स्वत:चा अभ्यास पहिला करा. तुम्हाला काय आवडते. कोणता विषय चांगला हाताळू शकता. तुमची आवड काय आहे. हे जेव्हा तुम्हाला क्लिक होईल तेव्हा तुम्ही तुमच्या आई- वडिलांना याविषयी कल्पना द्या.

अभ्यासक्रम निवडताना काय काळजी घ्याल
कोणताही पदवी घेताना किंवा अभ्यासक्रम निवडताना त्याचा परिपूर्ण अभ्यास करा. तुम्ही जो अभ्यास करणार आहात त्याचा तुम्हाला काय फायदा होणार, त्या अभ्यासक्रमाचे बाजारमूल्य काय आहे. याचा अभ्यास करा.

बाजारमुल्यानुसार स्वत:मध्ये बदल करा
तुम्ही करिअर करत असताना एक अमुक कोर्स, डिग्री पूर्ण झाली की जाॅब मिळतो. असा विचार जवळपास सर्वजण करत असतात. मात्र तुम्ही एका मर्यादित साच्यात अडकून पडता. तुम्हाला जर कुछ तुफानी करते हे असे काहीतरी करायचं असेल तर मात्र वेगळी वाट शोधावी लागेल. यासाठी तुम्हाला मातृभाषेसह किमान चार वेगळ्या भाषा अवगत करता आल्या पाहिजेत. तुमच्याकडे जर भाषेचे नाॅलेज असेल तर तुम्हाला सहज परदेशातही अनेक जाॅब मिळू शकतात.

जाणून घेऊया कोणत्या संधी आहेत.
बारावी नंतर आर्ट‍्स, कॉमर्स,सायन्स असे पर्याय आहेत. याशिवाय व्यवसायभिमुक पर्यायही तुम्ही निवडू शकता. या तिन्ही क्षेत्रात कोणत्या संधी आहेत हे जाणून घेऊया

आर्ट‍्स-
भाषा, सामाजिक शास्त्रे विषयांत पदवी घेता येते. शिवाय यूपीएससी, एमपीएससी, बँक आदी परीक्षांचा पूरक म्हणून उपयोग होतो.

कॉमर्स- बीकॉम, बीबीए, बीसीए,सीए, सीएस, कॉस्ट अकौंटंट, फायनान्शिअल अॅनलिस्ट असे पर्याय निवडू शकता.

सायन्स-इंजिनीअरिंग, मेडिकल, स्थापत्य, फार्मसी टिग्रेटेड एमएस्सीसारखेही संशोधनाला प्राधान्य देणारे कोर्सेस आहेत.

बीएसएल, पत्रकारिता , हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम, फॅशन, टेक्नॉलॉजी, इंटेरिअर डिझाइन असेही पर्याय निवडू शकता.

Related Stories

जिल्हय़ाला ‘निसर्ग’चा तडाखा

Patil_p

जिल्हय़ात विंचूदंश लसीची उपलब्धता पुरेशी

Patil_p

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपचे 8 बंडखोर आमदार सपामध्ये दाखल

datta jadhav

लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करा

Abhijeet Shinde

…आणि केंद्राची प्राथमिकता सोशल मीडिया; खोटी इमेज : राहुल गांधी

Rohan_P

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांचे निधन

Rohan_P
error: Content is protected !!