Tarun Bharat

१२ वी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स नंतर ‘या’ क्षेत्रात आहेत करियरच्या संधी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

आज विद्यार्थी दशेत भेडसावणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांपैकी दोन ठरलेले प्रश्न जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतात ते म्हणजे दहावीनंतर काय करावे आणि १२ वी नंतर काय करावे ? विद्यार्थ्यांबरोबरच पालकही चिंतेत असतात. तसं बघायला गेलात तर तुम्ही दहावीनंतर कोणते क्षेत्र निवडता या निर्णयावर तुम्ही बारावीनंतर काय करावे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळू शकते. भारतीय शिक्षणपद्धतीनुसार बारावी ही शालेय जीवनातील शेवटची अवस्था आहे. १२ वी नंतर काय करावे याचा निर्णय आपण निष्काळजीपणाने घेऊ शकत नाही. यासाठी आपणास विविध घटक विचारात घ्यायला हवेत.

बारावीनंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्याच्या कारकिर्दीचा पाया रचतात. म्हणूनच, विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. बारावीनंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतले करिअरचे अनेक पर्याय आहेत. पण योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विद्यार्थी चिंतेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास १२ वी नंतर ते करियरचा योग्य मार्ग निवडू शकतील.

सध्या अमुक क्षेत्रात तेजी आहे किंवा माझ्या मित्राने अमुक शाखेत प्रवेश घेतला म्हणून मी क्षेत्र निवडले या आधारे करिअर निवडणे, हा विवेकशून्य निर्णय ठरू शकतो. नेमके कोणते शिक्षण आपल्या पाल्याला योग्य ठरू शकते हे ठरविणे अवघड आहे. परंतु उपलब्ध शिक्षणाचे विविध अभ्यासक्रमांचे पर्याय व त्यातून मिळणारा भविष्यातील रोजगार त्याचबरोबर सध्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मनुष्यबळाची मागणी, सामाजिक गरज, पाल्याची आवड, जिद्द व बौद्धिक कुवत आदी घटकांचा पुरेपूर विचार केल्यास दहावी किंवा बारावीनंतरचे शिक्षण निवडण्यास निश्चित ठोस दिशा मिळू शकते. त्यामुळे १२ वी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात करियरच्या काय संधी उपलब्ध आहेत ते पाहूया.

१२ वी आर्टस् –
दरवर्षी शेकडो विद्यार्थी १२ वी कला शाखेतून उत्तीर्ण होत असतात. पण अनेकजणांना १२ वी आर्टस् नंतर काय करावे हेच समजत नाही. बऱ्याचदा १२ वी नंतर कोणते कोर्सेस आहेत हेच माहित नसते. त्यामुळे बरेच विद्यार्थी त्यापासून वंचित राहतात. त्यामुळे १२ वी आर्टस् नंतर करियरच्या काय संधी आहेत हे पाहूयात…

भारतात १२ वी आर्टस् नंतर असंख्य अभ्यासक्रम आहेत. अॅनिमेशन, कायदा, पत्रकारिता, मानवशास्त्र, व्यवस्थापन, फॅशन किंवा टेक्सटाइल डिझाइन, हवाई वाहतूक, बँकिंग किंवा इतर कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करा, कला विद्यार्थ्याच्या निवड करण्याकरिता भरपूर करिअर पर्याय असतील.

१२ वी कला शालेय अभ्यासक्रम
व्यवस्थापन
बॅचलर ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशन (बीबीए)
बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बी.बी.एम.)
बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस)
डिझायनिंग
फॅशन डिझायनिंग
टेक्सटाईल डिझायनिंग
अंतर्गत डिझाइन
अॅनिमेशन आणि मल्टिमीडिया –
अॅनिमेशन डिझाइन
ग्राफिक डिझाइन
वेब डिझाइन
हॉटेल मॅनेजमेंट
इव्हेंट मॅनेजमेंट
प्रवास आणि पर्यटन
मीडिया / चित्रपट / पत्रकारिता –
पत्रकारिता
मास कम्युनिकेशन
मीडिया व्यवस्थापन
कायदा / मानवीय –
कायदा
अर्थशास्त्र
मानसशास्त्र
समाजशास्त्र
इतर अभ्यासक्रम –
फोटोग्राफी
हवाई सुंदरी (Air Hostess Course Information in Marathi)
अभिनय / मॉडेलिंग
क्रिएटिव्ह आर्ट्स
साहित्य
राज्यशास्त्र आदी.

१२ वी कॉमर्सनंतर करता येणारे कोर्सेस
कॉमर्स शाखेतून बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या बर्‍यापैकी जास्त आहे. बारावीत कॉमर्स शिकणार्‍या विद्यार्थ्यांकडे पदवी स्तरावर अनेक कोर्स पर्याय आहेत. या विद्यार्थ्यांना एक फायदा म्हणजे ते कोर्स तसेच कला कोर्स देखील करू शकतात.

CA
CS
ATD
ऑटोकॅड
B.Voc
बी.कॉम
बी.एड
बी.ए
बँकिंग
बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन)
बीबीआय
बीसीए
सौंदर्य प्रसाधनगृह
MBA
BMM
BMS
बीएसडब्ल्यू
सीए
CMA
सी.एस
CTC
डेटा एंट्री ऑपरेटर
डिजिटल मार्केटिंग
DMLT
DTL
DTP (डेस्कटॉप प्रकाशन)
इव्हेंट मॅनेजमेंट
अग्निशमन दल
अग्निसुरक्षा
GDCA
गोल्फ
ग्रामसेवक
ग्राफिक डिझाइन
जीएसटी
हॉटेल व्यवस्थापन
हवाई सुंदरी
अॅनिमेशन
आयसीए
ICWA
आयात निर्यात
आयटीआय
पत्रकारिता
एलएलबी
मेकअप आर्टिस्ट
मास कम्युनिकेशन
माँटेसरी
एनडीए
छायाचित्रण
टॅली कोर्स
टूर्स आणि ट्रॅव्हल्स
VFX

१२ वी सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांकडे अन्य विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पर्याय आहेत. विज्ञान शाखेतील विद्यार्थी आर्ट अँड ह्युमॅनिटीज किंवा कॉमर्सचा कोर्स घेऊ शकतात. परंतु वाणिज्य व कला शाखेचे विद्यार्थी विज्ञान संबंधित अभ्यासक्रम घेऊ शकत नाहीत. तसे, बहुतेक लोकांना केवळ १२ वी सायन्स नंतरच्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांबद्दल माहिती असते. पण बारावी सायन्स नंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांशिवाय बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

१२ वी नंतर विज्ञान (पीसीएम) कोर्स पर्याय
१. अभियांत्रिकी (बीटेक / बीई)
एरोनॉटिकल अभियांत्रिकी
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी
सिव्हील अभियांत्रिकी
इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन अभियांत्रिकी
औद्योगिक अभियांत्रिकी
माहिती तंत्रज्ञान
इंस्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल अभियांत्रिकी
केमिकल अभियांत्रिकी
खाण अभियांत्रिकी
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी
सागरी अभियंता आयएनजी
प्रिंट आणि माध्यम तंत्रज्ञान
परमाणू अभियांत्रिकी
विद्युत अभियांत्रिकी
डेअरी तंत्रज्ञान
मेकॅनिकल इंजिनिअरिंग

२. आर्किटेक्चर
३. कॉम्प्युटर अॅप्लिकेशन
४. मर्चंट नेव्ही
५. नॉटिकल टेक्नॉलॉजी मधील बी.एससी
६. नॅव्हल आर्किटेक्चर अँड शिपबिल्डिंग मधील बी.टेक
७. बीएससी – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, फॉरेन्सिक विज्ञान, भूविज्ञान, कृषी, माहिती तंत्रज्ञान, सांख्यिकी, औद्योगिक रसायनशास्त्र, फॅशन तंत्रज्ञान, होमसायन्स, न्यूट्रिशन, क्लोदिंग अँट टेक्सटाइल, एक्स्टेंशन आणि कम्युनिकेशन, समुद्री विज्ञान, मानव विकास आणि कौटुंबिक अभ्यास, फॅशन डिझाइन, पर्यावरण विज्ञान इत्यादी विषयांतीली बीएससी.
८. व्यावसायिक पायलट
९. एव्हिएशन विज्ञान मधील बीएससी
१०. संरक्षण

बारावी विज्ञान (पीसीबी) नंतरचे अभ्यासक्रम
एमबीबीएस
BDS-दंतचिकित्सा
बीएएमएस-आयुर्वेद
बी.एच.एम.एस.-होमिओपॅथी
बीयूएमएस – यूनानी
बीएनवायएस – निसर्गोपचार आणि योगिक विज्ञान
बीएसएमएस-सिद्ध चिकित्सा व विज्ञान
पशुवैद्यकीय सेवा व पशुसंवर्धन
फिजिओथेरपिस्ट
बीएससी व्यावसायिक थेरपिस्ट
बीएससी न्यूट्रिशन अँड डायटिटिक्स
इंटिग्रेटेड एमएससी
बीएससी- बायोटेक्नॉलॉजी
बीएससी (दुग्ध तंत्रज्ञान / नर्सिंग / रेडिओलॉजी / प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, ऑप्टोमेट्री)
बीएससी स्पीच अँड लॅँग्वेज पॅथॉलॉजी
बीएससी अँथ्रोपॉलॉजी
बीएससी रेडियोग्राफी
बीएससी पुनर्वसन थेरपी
बीएससी फूड टेक्नोलॉजी
बीएससी हॉर्टिकल्चर
बीएससी होम सायन्स / न्यायवैद्यक
बॅचलर ऑफ फार्मसी
बीएमएलटी (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)
बीओटी (ऑक्युपेशनल थेरपी)

१२ वी सायन्स नंतर बिझनेस आणि कॉमर्स अभ्यासक्रम
बी.कॉम
हॉटेल मॅनेजमेंटमध्ये
रिटेल मॅनेजमेंटमध्ये बीए
रिटेल मॅनेजमेंटमध्ये बीए
हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीएससी
फॅशन मर्चेंडायझिंग अँड मार्केटिंग मधील बीए
ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट मध्ये बीए
बॅचलर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स
बॅचलर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस अ‍ॅण्ड फायनान्स
मॅनेजमेंट स्टडीज
बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
बँकिंग आणि इन्शुरन्स
चार्टर्ड अकाउंटन्सी
कंपनी सेक्रेटरी

१२ वी सायन्स नंतरचे डिप्लोमा कोर्स
न्यूट्रिशन अँड डायटिटिक्समधील डिप्लोमा
डिप्लोमा नर्सिंग
टेक्सटाइल डिझाइनिंगमध्ये डिप्लोमा
डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग
डिप्लोमा इन वेब डिझाईन
डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग
सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये डिप्लोमा
इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा
ड्रॉईंग अँड पेंटिंग
डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग
डिप्लोमा कॉम्प्युटर हार्डवेअर
डिप्लोमा इन अॅनिमेशन अँड मल्टिमीडिया
डिप्लोमा (एअर होस्टेस, क्रू)
डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट
केमिकल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा
सॉफ्टवेअर अँड नेटवर्किंग मधील डिप्लोमा
फॉरेन लँग्वेज मध्ये डिप्लोमा

बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. बारावीनंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्याच्या कारकिर्दीचा पाया रचतात. म्हणूनच, विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. बारावीनंतर कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील करिअरचे अनेक पर्याय वर दिले आहेत.

Related Stories

झोमॅटोकडून होणार 400 जणांची भरती

Amit Kulkarni

‘अपग्रेड’कडून लवकरच 1 हजार जणांची भरती

Amit Kulkarni

शरद पोंक्षे यांचे वेबसिरीजमध्ये पदार्पण

Patil_p

दहावी बारावी परीक्षेत अडचण येणार नाही- चंद्रकांत पाटील

Archana Banage

राज्यात जवळपास १३००० हजार हून अधिक प्राध्यापक,सहा. प्राध्यापकांची पदे रिक्त

Archana Banage

सीमा सुरक्षा दल

tarunbharat