Tarun Bharat

जखमी माकडाची काळजी

मुक्या जनावरांवर प्रेम करा, असे आपण एकमेकांना नेहमी सांगतो. तथापि, आपण घरात पाळलेले प्राणी वगळता इतर प्राण्यांच्या सुखदुःखाकडे आपले क्वचितच लक्ष जाते. विशेषतः भटकी जनावरे आपल्या दृष्टीने एक अडचणच असतात. त्यांचा बंदोबस्त होईल तर बरे, असे आपल्याला वाटत असते.

तथापि, मध्यप्रदेशातील एका गावातील ग्रामस्थांनी एका जखमी माकडासाठी जी संवेदनशीलता दाखविली आहे, ती सर्वांसाठी आदर्श ठरावी अशीच आहे. अलीकडच्या काळात हायटेन्शन विद्युत तारांचे जाळे सर्वत्र पसरले आहे. या तारांचा स्पर्श विशेषतः माकडांना नेहमी होत असतो आणि ती जखमी होऊन खाली पडतात. मध्यप्रदेशातील सिवोर जिल्हय़ातील नसरुल्लागंज येथील लाडकोई या खेडय़ात अशाचप्रकारे एका हायटेंन्शन वायरचा स्पर्श होऊन काळय़ा तोंडाचे एक माकड गंभीर जखमी झाले. विजेचा शॉक लागल्याने ते जायबंदी होऊन रस्त्यावर पडलेले दिसून आल्यानंतर गावातील अनेकांनी त्याची सुश्रुषा केली. त्याच्या जखमांवर प्रथमोपचार करवून त्याला शुद्धीत आणले. तसेच त्वरित पशु डॉक्टरांना बोलावून त्यांच्याकडून या माकडावर उपचार करून घेतले. उपचारांचा खर्च गावकऱयांनी पैसे जमा करून केला. प्रशासनालाही ही घटना कळविण्यात आली. आता हे माकड सुधारत असून त्याची प्रकृती धोक्मयाबाहेर आहे, असे सांगण्यात आले आहे. प्रशासनाने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू केले असून लवकरच ते पुन्हा त्याचे नेहमीचे जीवन सुरू करेल, अशी शक्मयता वाढली आहे. एका माकडाला अशाप्रकारे क्रियाशील सहानुभूती दर्शविल्याबद्दल या गावकऱयांचे कौतुक होत असून त्यांचा आदर्श घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

जम्मू-काश्मीरसंबंधी महत्त्वाचा निर्णय शक्य?

Patil_p

मोदी सरकारने देशद्रोह केला

datta jadhav

सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम

Patil_p

राजस्थानात विधासभा अधिवेशनास अनुमती

Patil_p

… तर सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही : संजय राऊत

Tousif Mujawar

पंजाब काँग्रेसमधील कलह सुरूच

Patil_p