Tarun Bharat

जपानमध्ये धावणार ‘नेत्र’युक्त कार

Advertisements

रस्ता ओलांडताना स्वतःच लावणार ब्रेक, होणार नाही दुर्घटना

जपानमध्ये कारसंबंधी अत्यंत नवा प्रयोग करण्यात येत आहे. रस्ते दुर्घटना रोखण्यासाठी कार्ससमोर मोठमोठे डोळे लावण्यात येणार आहेत. हे अर्टिफिशियल (कृत्रिम) नेत्र जपानच्या सेल्फ ड्रायव्हिंग कारवर लावण्यात येणार असून ते डाव्या तसेच उजव्या बाजूला वळू शकतात. कार रस्त्यावर धावत असताना पायी चालणारे लोक कारला पाहून आपोआप सावध होतील, यामुळे दुर्घटनांचे प्रमाण कमी होणार आहे. तरीही कारसमोर कुणी आल्यास ही कार आपोआप थांबणार आहे.

कारवर बसविण्यात आलेले नेत्र कुठल्याही दिशेने पाहत नसल्यास याचा अर्थ कार पायी चालणाऱयांची ओळख पटवू शकत नसल्याचे इंजिनियर्सचे म्हणणे आहे. याचमुळे समोर कोण आहे हे कारने ओळखल्यास रस्ते दुर्घटनांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी होऊ शकते. गेजिंग कारमुळे पायी चालणाऱया लोकांसोबत होणाऱया कार दुर्घटना रोखता येऊ शकतील अशी अपेक्षा आहे.

व्हर्च्युअल रियलिटीवर आधारित प्रयोग

इंजिनियर्सनी प्रयोगादाखल गोल्फच्या व्हेईकलवर कृत्रिम नेत्र बसविले. हे नेत्र डाव्या तसेच उजव्या बाजूला वळत होते, यांचे नियंत्रण संशोधकांडे होते. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर सेल्फ ड्रायव्हिंगयुक्त कार्सकरता केला जाणार आहे. या कार आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने नियंत्रित होतात. व्हर्च्युअल रियॅलिटीवर आधारित या प्रयोगात इंजिनियर्सनी 9 पुरुष आणि 9 महिलांना सामील केले. नेत्रयुक्त वाहनासमोर रस्ता ओलांडण्याचा निर्णय स्वयंसेवकांना स्वतःच्या विवेकबुद्धीने घ्यायचा होता.

सतर्क झाले लोक

या प्रयोगात चार स्थिती होत्या, दोन स्थितींमध्ये कारवर कृत्रिम नेत्र होते, तर दोन स्थितींमध्ये नेत्ररहित कार होत्या. सुरक्षित असूनही लोक नेत्रयुक्त कारसमोर रस्ता ओलांडण्यास घाबरत होते, तर नेत्ररहित कारसमोर सहजपणे रस्ता ओलांडत होते असे आढळून आले. याचाच अर्थ हा नवा प्रयोग रस्ते दुर्घटना कमी करण्यास सहाय्यभूत ठरू शकतो.

Related Stories

भारत-पाकच्या काश्मीर वादावर चीनने दिला सल्ला,चीनच्या सल्ल्यावर भारताचे प्रत्युत्तर

Kalyani Amanagi

पंतप्रधान मोदी यांनी घेतली राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट

Abhijeet Khandekar

पदक निश्चित! रवीकुमार दहियाचा अंतिम फेरीत प्रवेश

datta jadhav

टय़ुनिशियात कोरोनाचा उद्रेक वाढला

Patil_p

आर्क्टिकवरील हिमावर आधुनिक पद्धतीने लक्ष

Patil_p

युक्रेनमध्ये सैन्यविमान कोसळले

Patil_p
error: Content is protected !!