Tarun Bharat

कुठलेच काम न दिल्याने खटला

आयर्लंडमध्ये रेल्वे कर्मचाऱयाचे बॉसविरोधात पाऊल

आयर्लंडमध्ये डबलिनमध्ये एका रेल्वे कर्मचाऱयाने स्वतःच्या बॉसविरोधात खटला दाखल केला आहे. मी ऑफिसमध्ये रिकामी बसलेला असतो, मला कुठलेच काम करायला दिले जात नसल्याचे या रेल्वे कर्मचाऱयाचे म्हणणे आहे. रेलरोड अकौंटबद्दल प्रश्न विचारल्याने बॉस मला अशाप्रकारे शिक्षा देत असल्याचा आरोप या कर्मचाऱयाने केला आहे.

डर्मोट अलास्टॅयर मिल्स आयरिश रेल्वेमध्ये फायनान्स मॅनेजर आहे. 2014 मध्ये मी कंपनीच्या अकौंटमधील फेरफाराची माहिती समोर आणली होती. तेव्हापासूनच वरिष्ठांनी साइडलाइन करणे सुरुवात केल्याचे मिल्सचे म्हणणे आहे.

वृत्तपत्रांचे वाचन करून घालवितो वेळ

माझा दिवस वृत्तपत्र वाचन आणि सँडचिव खात तसेच दीर्घ वॉकवर जाऊन संपत आहे. वेळ जावा म्हणून मी दोन वृत्तपत्रे विकत घेतोय. तसेच एक सँडविच घेत स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन बसतो. स्वतःचा संगणक सुरू केल्यावर ईमेल पडताळून पाहतो, त्यावर कामाशी निगडित कुठलाच ईमेल नसतो. तसेच कुठल्याही सहकारी माझ्याशी बोलत नसल्याचा दावा मिल्सने केला आहे.

काहीच न करण्यासाठी 1.02 कोटी

काहीच काम न करण्यासाठी वर्षाला मला 1.02 कोटी रुपये मिळतात. मी अधिक काम मागत नाही, परंतु आठवडय़ात एक दिवस काही काम करण्यास दिले तर मला आनंद होईल असे मिल्स यांचे म्हणणे आहे.

Related Stories

युरोपीय महासंघाचे स्वतःचे सैन्य असणार

Patil_p

श्रीलंकेत नवा डेल्टा व्हेरीयंट आढळल्याने वाढली चिंता

Patil_p

ट्विटरच्या 40 कोटी ग्राहकांच्या माहितीची चोरी

Patil_p

पाण्याअभावी 6 जिराफांचा अंत

Amit Kulkarni

अखुंदजादाला सर्वोच्च पदावरून हटविण्याची तयारी

Patil_p

युक्रेन युद्धाच्या उंबरठय़ावर

Patil_p