ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या कसबा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रासने यांनी कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केले होते.
कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. यावेळी भाजपचे अधिकृत चिन्ह असलेले कमळाचे उपरणे रासने यांनी गळ्यात घातले होते. यासंदर्भात राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. निवडणूक आयोगाने या तक्रारीची तात्काळ दखल घेत रासने यांच्यावर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देण्यात आले होते.
अधिक वाचा : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 41.06 टक्के मतदान