Tarun Bharat

माजी नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

जत, प्रतिनिधी

जत येथील नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते तथा भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड यांच्या हत्ये प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा दोघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी संदीप उर्फ बबलू चव्हाण (रा. जत) व अन्य एका अनोळखी व्यक्तीवर खुनाचा गुन्हा जत पोलिसांनी दाखल केला आहे. याप्रकरणी मयत विजय ताड यांचे मोठे बंधू विक्रम ताड यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणात जतचे माजी नगरसेवक उमेश सावंत यांचाही फिर्यादीत उल्लेख झाल्याने शहरासह जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे . नगरसेवक ताड यांची शुक्रवारी दुपारी येथील अल्फोंसा स्कूल जवळ गोळीबार करून व दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे . विक्रम ताड यांनी दिलेल्या फिर्यादीत संदीप उर्फ बबलू चव्हाण व अन्य एका अनोळखी व्यक्तीने पाळत ठेऊन हा खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे . तसेच या खून प्रकरणात आता सावंत यांच्या फिर्यादीतील उल्लेखामुळे राजकारणाशी संबंधित चर्चेलाही उधाण आले आहे. पोलीस मात्र सर्व शक्यतांची पडताळणी करून कसून तपासणी करत आहेत.

Related Stories

लग्न करण्याचे अमिष दाखवून वैमानिकाला ५९ लाखांचा गंडा

Archana Banage

सांगली : आमणापूर परिसरात मगरीचा वावर

Archana Banage

मिरजेत काल गर्दी, आज रस्त्यांवर सन्नाटा

Archana Banage

परदेशात जाणाऱ्या ५० जणांना लस

Archana Banage

सांगली : सराईत गुंड भावश्या पाटीलला सक्तमजुरीची शिक्षा

Archana Banage

सांगली : लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजुर चालले गावाकडे…

Archana Banage