मनपाचे गाळे भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया वादाच्या भोवऱयात : लिलाव प्रक्रियेस स्थगिती
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचे गाळे भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया वादाच्या भोवऱयात सापडली आहे. पूर्वसूचना न देता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आल्याचा दावा करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करून लिलाव प्रक्रियेस स्थगिती घेण्यात आली आहे. सदर दाव्याची सुनावणी शुक्रवारी होती. यावेळी युक्तिवाद झाला असून अंतिम सुनावणी दि. 28 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपुष्टात आल्याने लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. दि. 6 ते 19 मे दरम्यान आयोजित केलेल्या लिलावावेळी काही मोजक्मयाच गाळय़ांचा लिलाव झाला होता. याचदरम्यान काही जुन्या भाडेकरूंनी स्थानिक न्यायालय आणि धारवाड उच्च न्यायालयात याचिका दाखल करून लिलाव प्रक्रियेस स्थगिती मिळविली आहे. गाळय़ांचा ताबा आपल्याकडे असल्याचा दावा करून लिलाव आयोजित करण्यापूर्वी पूर्वसूचना दिली नसल्याची तक्रार न्यायालयात करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक व उच्च न्यायालयाकडून लिलाव प्रक्रियेस स्थगिती मिळाली होती. सदर स्थगिती हटविण्यासाठी महापालिकेने आपले म्हणणे उच्च न्यायालयात दाखल केले आहे. याबाबत शुक्रवारी सुनावणी होती. मात्र युक्तिवादानंतर सदर याचिकेची अंतिम सुनावणी मंगळवार दि. 28 रोजी होणार आहे. त्यामुळे महापालिकेला 28 तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच स्थानिक न्यायालयात 20 भाडेकरूंनी याचिका दाखल केली आहे. सदर सुनावणी 30 जून रोजी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.