कुमठा तालुक्यातील प्रवाशाकडे योग्य कागदपत्रे नसल्याने कारवाई : नाक्मयावर कडक तपासणी
प्रतिनिधी / निपाणी
कोगनोळी तपासणी नाक्मयावर खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून दीड कोटीची रोकड बुधवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास जप्त करण्यात आली. अशोक गंगाधरशेठ (रा. तरमक्की, ता. कुमठा, जि. उत्तर कन्नड) असे रोकड जप्त करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे.
याबाबत निपाणी ग्रामीण पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाने तपासनाके उभारले आहेत. याठिकाणी वाहनांची कडक तपासणी करताना अवैध वाहतुकीला आळा घालण्यात येत आहे. निपाणीनजीक महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरती कोगनोळीनजीक तपासणीनाका उभारण्यात आला आहे. याठिकाणी गत आठ दिवसांत रोकड, साड्यांसह अन्य साहित्य जप्त केले आहे.
बुधवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी नाक्मयावर कसून चौकशी करण्यात आली. यावेळी खासगी ट्रॅव्हल्स (जीए 08 व्ही 7224) यातून मुंबईहून मंगळूरकडे जाणारा प्रवासी अशोक गंगाधरशेठ यांच्याकडून तब्बल दीड कोटीची रक्कम जप्त करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने ही कारवाई करण्यात आली. निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, तपासणीनाका अधिकारी कृष्णा नाईक, पीडीओ लक्ष्मण नारे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.