प्रतिनिधी /पणजी
पणजीतील क्राऊन गोवा या तारांकित हॉटेलमध्ये कॅसिनो चालवण्यासाठी आवश्यक ते परवाने हॉटेल व्यवस्थापनाने घेतलेले आहेत. तसेच हा जुगारी अड्डा चालवण्यासाठी खास दालने बांधण्यात आली आहेत. त्यासाठी हॉटेलमधील खोल्यांचा वापर केला जात नाही, असा खुलासा सदर हॉटेल व्यवस्थापनाने केला आहे.
या हॉटेलमध्ये चालू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली तेव्हा हॉटेलमधील खोलीत जुगार चालू होता अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली होती. त्यावर सदर खुलासा हॉटेल व्यवस्थापनाने केला व हा जुगार बेकायदेशीर नसून आवश्यक ते सर्व परवाने घेण्यात आलेले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.