Caste and non-crimliar documents in Sawantwadi District Magistrate office
सावंतवाडी प्रांताधिकारी हे 23 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत सुट्टीवर आहेत. त्यांचा तात्पुरता पदभार जिल्हा भू संपादन अधिकारी श्रीमती वर्षा शिंगण यांच्याकडे देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत निवडणूक, पोलीस भरती करीता जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेयर दाखले सध्या मोठय़ा प्रमाणात प्राताधिकारी कार्यालयात येऊन पडलेले आहेत. पण ते दाखले प्रांताधिकारी यांची सही ही गॅझेटेड केलेली असल्याने प्रभारी पदभार असलेल्या व्यक्ती म्हणजे अधिकाऱ्याची सही ऑनलाईनमध्ये स्वीकृत होत नाही. या टेक्नीकल प्रॉब्लेममुळे पोलीस भरतीतील असंख्य बेराजगार युवक-युवती तसेच ग्रामपंचायत निवडणुकिसाठी उमेदवार म्हणून उभे रहाणाऱ्या इच्छुकांना हि महत्वपूर्ण कागदपत्रे वेळीच मिळत नसल्याने त्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सावंतवाडी प्रांताधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत तात्पुरता पदभार दिलेल्या जिल्हा भू संपादन अधिकारी श्रीमती वर्षा शिंगण यांना ऑफलाईन पध्दतीने जातीचे व नॉनक्रिमीनल दाखले देण्याचे यावेत. व हा अन्याय दूर करावा. अशी मागणी बेरोजगार युवक-युवती, त्यांचे पालक, ग्रामपंचायत निवडणुकिसाठी इच्छुक असलेल्या व या दाखल्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींकडून होत आहे.
वेंगुर्ले (वार्ताहर)-