तरुणभारत ऑनलाइन
भारतात सर्वत्र मिळणारी आणि सर्व आजरांवर गुणकारी असणारी वनस्पती म्हणजे एरंडेल वनस्पती. या वनस्पतीपासून मिळणार एरंडेल तेल अष्टपैलू तेल आहे. जे केस आणि त्वचा रोगांसोबतच शरीराच्या अनेक रोगांना दूर करण्याची क्षमता ठेवते. वेदामध्ये देखील एरंडाच्या तेलाला अधिक महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे आयुर्वेदानुसार केस गळतीसाठी आणि त्वचेसाठी हे तेल रामबाण उपाय ठरते.आज आपण एरंडेल तेलाचे आणखी कोणते फायदे आहेत हे पाहणार आहोत.
केसांच्या आरोग्यासाठी एरंडाचे तेल खूप उपयोगी आहे हे तेल केसांना योग्य पोषण देते. या तेलात रेसिनोलेईक ॲसिड सोबतच ओमेगा 6 आणि आवश्यक फॅटी ऍसिड असतात. जे डोक्यातील रक्त प्रवाह सुरळीत ठेवून केसांचे आरोग्य सुधारतात. केसांमध्ये एरंडेल तेल लावल्याने केसांची पौष्टिकता वाढते आणि केस वाढवण्यासाठी मदत मिळेल.याशिवाय जर केसांमध्ये डेंड्रफ आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल तर एका वाटीत थोडेसे नारळाचे तेल घ्यावे या तेलात एरंडेल तेल मिसळावे. दोन्ही तेल चांगल्या पद्धतीने एकत्रित करावे आणि केसांमध्ये लावावे. असे केल्याने केसांमधील डेंड्रफ इन्फेक्शन इत्यादी समस्या दूर होतात सोबतच केसांमधील खाज देखील समाप्त होते.
त्वचेला चमकदार बनवण्यासाठी एरंडाचे तेल खूप फायद्याचे ठरते त्वचेसाठी एरंडेल तेल रामबाण उपाय म्हणून सांगितले जाते. एरंडेल तेल चे फायदे चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी गुणकारी आहेत. चेहऱ्यावर डाग आल्यावर एरंडेल तेल चेहऱ्यावर लावावे. हे तेल लावल्याने चेहऱ्यावर असलेल्या मृत पेशी निघून जातात आणि वांग व काळे डाग फिकट होऊन जातात.
खास करून या तेलाचा उपयोग डोळ्यांची समस्या, मूळव्याध, खोकला, पोट दुखणे इत्यादी समस्यांमध्ये केला जातो. एरंडेल तेल कप, वात आणि पित्त नियंत्रणात आणण्याचे कार्य देखील करते. याशिवाय अनेक औषधी बनवण्यासाठी देखील एरंडेल तेलाचा उपयोग केला जातो.