Tarun Bharat

6 फुटी मगर पकडून केली थरारक मोहिम फत्ते…

रंगराव बन्ने / कारदगा

कारदगा येथील दूधगंगा नदीकाठावर मासेमारीसाठी गेलेल्या तरूण युवकानी धाडसाने सहा फुटी मगरीला जेरबंद करून ग्रामस्थांची या मगरी पासून सुटका केली आहे आहे.

गुरुवार दि.28 रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान बंडू गावडे (हेबुले)व त्याचे मित्र दूधगंगा नदी काठावर मसोबा वता जवळ मासेमारीसाठी गेले होते. पाण्यामध्ये गळ टाकून मासेमारी करीत असताना गळाला मोठा मासा लागला आहे.असे वाटले पण त्याच वेळी गळाला मोठी मगर लागली होती. त्यावेळी धाडसाने काठीला दोरी बांधून बराच वेळ प्रयत्न करुन मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अखेर सहा फुटी मगर तरुनानी धाडसाने जेरबंद केली.

ही मगर जेरबंद करण्यासाठी बंडू गावडे, किसन मधाळे, सुशांत शिंगे, नागेश कांबळे, साताप्पा डांगे, नागेश कराळे, भाऊसो गावडे,प्रदीप कुरणे, या तरुणांनी आपले धाडस पणाला लावले आणि शेवटी ही मगर जेरबंद करून गावच्या ग्रामपंचायत जवळ घेऊन आले.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आसमा कलावंत यांनी या तरुणांना सहकार्य केले यावेळी मगर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.

गेल्या वर्षभरापासून दूधगंगा नदी पात्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर होऊ लागला असून अगदी गर्दीच्या ठिकाणी नदीच्या जवळ देखील मगरी बिनधास्त वावरू लागल्या आहेत त्यामुळे नदीकाठावर चारा आणण्यासाठी व मोटर चालू करण्यासाठी जाणारे ग्रामस्थ, भयभीत होऊ लागले होते.त्यामुळे या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने होत आहे. या अगोदर देखील येथील तरुणांनी धाडसाने आठ फुटी मगर जेरबंद केली होती त्या पाठोपाठ आता दुसऱ्यांदा तरून युवकांनी मगर जेरबंद करून धाडसी काम केले आहे कारदगा आणि पंचक्रोशीतून या तरुण युवकांचे तरुण मावळ्यांचे कौतुक होत आहे.

Related Stories

ड्रेनेजवाहिन्यांच्या चरीमुळे शिवबसवनगर रस्त्यावर चिखल

Amit Kulkarni

अखेर महिन्याभरानंतर वकिलांचे कामबंद मागे

Patil_p

मनपाच्या 9 पैकी 2 गाळय़ांचा लिलाव

Omkar B

पोलीस व्हॅन ठरतेय दुकानदारांना अडचणीची

Amit Kulkarni

स्मार्ट बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे

Amit Kulkarni

आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात ‘भीम ज्योत यात्रा’

Amit Kulkarni