इनरव्हील क्लबतर्फे ज्ञानप्रबोधन मंदिर शाळेत उपक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
इनरव्हील क्लबच्यावतीने ‘सावधान-इंटरनेट चालू है’ या अध्यक्षा शालिनी चौगुले यांच्या संकल्पनेतील उपक्रमाला ज्ञानप्रबोधन मंदिर शाळेमध्ये प्रारंभ करण्यात आला. अलिकडे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. विद्यार्थी याला अपवाद नाहीत. परंतु मोबाईल किंवा सोशल मीडिया हाताळताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. याच हेतूने हा उपक्रम सुरू आहे.
यावेळी शालिनी चौगुले यांनी स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू सांगितला. संध्या शेरेगार यांनी या उपक्रमाची गरज स्पष्ट केली. यावेळी डॉ. कीर्ती शिवकुमार व प्रा. विनोद देशपांडे यांनी मोबाईल व सोशल मीडिया कसा हाताळावा, याचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांचा परिचय उर्मी शेरेगार व मेधा शहा यांनी करून दिला.
प्राचार्य मंजिरी रानडे यांनी शाळेतर्फे सर्वांचे स्वागत केले. सचिव पुष्पांजली मुक्कण्णावर यांनी आभार मानले. 238 हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.