ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वेदांत समूहाच्या ऊर्जा प्रकल्पासाठी चिनी नागरिकांना व्हिसा देण्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम (Karti Chidambaram) आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे. तर आज चौकशीसाठी कार्ती सीबीआय कार्यालयात हजर झाला. दरम्यान, कीर्ती यांचे वडील पी चिदंबरम (P. Chidambaram) जेव्हा देशाचे गृहमंत्री होते तेव्हा हा कथित घोटाळा झाला होता. कार्ति यांनी या कारवाईला आधीच विरोध केला असून सीबीआयने माझ्यावर लावलेले आरोप निरर्थक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
युके आणि युरोपच्या दोन आठवड्यांच्या दौऱ्यावरून बुधवारी भारतात परतलेला कार्ती गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास एजन्सीसमोर हजर झाला. लोधी रोड येथील सीबीआय कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी कार्ती यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. “मी एकाही चिनी नागरिकाला व्हिसा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला नाही,” तसेच व्हिसा प्रकरण हे त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या एजन्सीच्या तीन प्रकरणांपैकी हे “सर्वात बोगस” प्रकरण होते, असे म्हंटले आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वेदांत समूहाच्या ऊर्जा प्रकल्पासाठी चिनी नागरिकांना प्रकल्प व्हिसा देण्याच्या चौकशीच्या संदर्भात गुरुवारी लोकसभा सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांची चौकशी केली. लाचेच्या मोबदल्यात पंजाबमधील वेदांत समूहाच्या ऊर्जा प्रकल्पासाठी चीनी नागरिकांना प्रकल्प व्हिसा दिल्याच्या आरोपाप्रकरणी चौकशी केली. तसेच कार्ती चिदंबरम यांची चौकशी व्हिसा सुलभ करण्यासाठी ५० लाख लाच दिल्याच्या आरोपाभोवती केंद्रित होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी कार्ती यांना त्यांचे सहाय्यक एस. भास्कररामन आणि वेदांत समूहाचे विकास मखरिया यांच्यातील ईमेलबद्दल देखील विचारण्यात आले होते, ज्यात नंतर त्यांचे आभार मानले होते आणि व्हिसा मंजूर करण्यासाठी एमएचएच्या परदेशी विभागाद्वारे जारी केलेले परवानगी पत्र जोडले होते.