Tarun Bharat

लालूंच्या घरासह १५ ठिकाणांवर CBI चे छापे

ऑनलाईन टीम/तरुण भारत

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) आणि त्यांची मुलगी मीसा भारती (misa bharati) यांच्या घरासह १५ ठिकाणी सीबीआयने छापा टाकला आहे. तसेच त्याच्या कार्यकाळात भरतीमध्ये अनियमितता प्रकरणी नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (CBI raids 15 places in corruption case against Lalu Prasad Yadav and daughter)

सीबीआयने शुक्रवारी सकाळीच कारवाईला सुरुवात केली. सीबीआय सध्या राजद प्रमुखांच्या पाटणा येथील निवासस्थानीही कारवाई करत आहे. याशिवाय सीबीआयचे पथक लालू यादव, त्यांची पत्नी राबडी देवी (rabadi devi)आणि मुलगी मीसा भारती यांच्या पाटणा, गोपालगंज आणि दिल्लीतील ठिकाणांवर छापे टाकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, RJD नेते लालू यादव यांच्यावर रेल्वे भरती घोटाळ्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईबाबत संपूर्ण माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे.

Related Stories

अरुणसिंग गोयल यांनी स्वीकारली निवडणूक आयोगाची सूत्रे

mithun mane

हिमाचलमध्ये पाऊस-हिमवृष्टीचा अलर्ट

tarunbharat

‘80 विरुद्ध 2’ची होणार निवडणूक

Patil_p

आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

Patil_p

‘पोक्सो’ अंतर्गत संमतीवयावर चर्चा व्हावी!

Patil_p

‘आकाश’ क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

datta jadhav