ऑनलाईन टीम / तरुण भारत :
CBI raids in 20 states including Maharashtra in child pornography case चाईल्ड सेक्शुअल पोर्नोग्राफीप्रकरणी सीबीआयने देशभरात 20 राज्यांमध्ये 56 ठिकाणी छापेमारी केली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, बेंगळूर, पाटणा अशा 20 राज्यांमध्ये ऑपरेशन ”मेघदूत” अंतर्गत सीबीआयचे छापसत्र सुरु आहे.
चाईल्ड पोर्नोग्राफी करणाऱ्या टोळ्या केवळ तेवढय़ापुरत्याच मर्यादीत नाहीत, तर त्यांचा संबंध लहान मुलांना फिजिकल ब्लॅकमेल करणे, मुलांचं शारीरिक शोषण करणं या प्रकरणाशी आहे. या टोळीकडून वेगवेगळे गुप बनवून वैयक्तिक पातळीवर काम सुरू आहे, अशी माहिती सिंगापूर आणि न्यूझीलंडच्या इंटरपोलकडून मिळाली होती. त्यानंतर सीबीआयने देशभरात कारवाईला सुरुवात केली आहे. आज महाराष्ट्र, दिल्ली, पाटणा आणि बेंगळूरसह 20 राज्यात 56 ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली आहे. गेल्या वषीदेखील सीबीआयने अशाच प्रकरे ऑपरेशन केले होते, ज्याचे नाव ऑपरेशन कार्बन होते.
अधिक वाचा : व्याजवाडीच्या जवानाची साताऱ्यात आत्महत्या