Tarun Bharat

गोव्यासह अनेक राज्यांत सीबीआयचे छापे

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ क्लिपिंग प्रकरण

प्रतिनिधी/ पणजी

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून नंतर त्याचे व्हिडिओ क्लिपिंग विकले जात असल्याचे उघड होताच सीबीआयने ‘ऑपरेशन मेघचक्र’ सुरू केले आहे. देशभरातील 20 राज्यांसह 56 ठिकाणी छापे मारून काही जणांना अटक केली असून काही व्हिडिओ जप्त केले आहेत. गोव्यातही छापा मारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र कोणाच्या अटकेबाबत किंवा काही जप्त केल्याबाबत त्याबाबत माहिती मिळू शकली नाही.

न्यूझीलंड इंटरपोलकडून सिंगापूरमार्गे आलेल्या वृत्तानुसार देशातील अनेक राज्यात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले जाते. त्यानंतर त्याचे व्हिडिओ क्लिपिंग ऑनलाईन विकले जाते. त्यानुसार सीबीआयने ऑपरेशन मेघचक्र अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. गोव्यासह हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, तामीळनाडू तसेच काही केंद्रशासीत प्रदेशात कारवाई सुरु करण्यात आली आहे.

Related Stories

नरकासुर प्रतिमा तयार करण्यास पावसाचा अडथळा

Omkar B

राज्यात 75 वा क्रांतिदिन साजरा

Amit Kulkarni

गोव्याचे माजी क्रीडा संचालक रॉक डायस यांचे निधन

Amit Kulkarni

संतोबा देसाई ग्रुपतर्फे मजुरांच्या जेवणाची सोय

Omkar B

स्वयंपूर्ण मित्रांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

Patil_p

दिवाळीसाठी नरकासूर मुखवटे, आकाश कंदिल विक्रीस आलेल्या विक्रेत्यांकडून स्विकारले 2500 रु.

Omkar B
error: Content is protected !!