Tarun Bharat

CBI Raid : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचे छापे

CBI Raids On Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापा (CBI Raid) टाकला आहे. सत्यंद्र सिंह यांच्यापाठोपाठ दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरात आता सीबीआय छापा टाकल्याची माहिती स्वत: मनिष सिसोदिया यांनी ट्वीट करुन दिली आहे.

सीबीआयच्या छाप्याबद्दलची माहिती देताना त्यांनी तीन ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात की, सीबीआय आली आहे. त्यांचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणार्‍यांचा अशा प्रकारे छळ होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून पहिल्या क्रमांकाचा बनलेला नाही,” असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या ट्वीटमध्ये सिसोदिया यांनी लिहिलं आहे की, आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करु जेणेकरुन सत्य लवकर समोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झालेलं नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझं काम थांबवता येणार नाही.

पुढच्या ट्वीटमध्ये मनिष सिसोदिया म्हणतात की, दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण, आरोग्याचे चांगले काम बंद पडाव, म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल.

Related Stories

लॉकडाऊनमधील सवलतींचा गैरफायदा घेवू नका : नगराध्यक्षा माधवी कदम

Archana Banage

लाच घेताना कनिष्ठ अभियंता जाळ्यात

Patil_p

सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोविडमध्ये 40 लाख भारतीयांचा मृत्यू : राहुल गांधी

Archana Banage

दौलतनगरमध्ये युवतीसह कुटुंबियांना मारहाण

Patil_p

सातारा तालुक्यात सहा जणांना कोरोनाची बाधा

Archana Banage

देशाचे माजी ॲटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन

datta jadhav