Tarun Bharat

चिदंबरम यांच्या 9 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या 9 ठिकाणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने छापे टाकले आहेत. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधातील एका प्रकरणात नऊ निवासी परिसर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. कार्ती चिदंबरम यांच्यावर अनधिकृतरित्या पैसे घेऊन 250 चिनी नागरिकांना व्हिसा दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने 2010-2014 दरम्यान नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्याच प्रकरणी आजची कारवाई करण्यात येत आहे.

Advertisements

चिदंबरम यांच्या चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, ओरिसा येथील एकूण नऊ ठिकाणी सीबीआयची कारवाई सुरू आहे. त्यामध्ये चेन्नईतील तीन, मुंबईतील तीन आणि कर्नाटक, पंजाब आणि ओरिसातील प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे. या छापेमारीदरम्यान कार्ती चिंदबरम यांचा एक ट्विट समोर आला आहे. त्यांनी त्यात लिहले आहे की, “हे किती वेळा घडले ते मी मोजायला विसरलो. हा एक विक्रम असेल” असे ट्विट कार्ती यांनी केले आहे.

पी. चिदंबरम देशाचे अर्थमंत्री असताना परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (एफआयपीबी) मान्यतेने आयएनएक्स मीडियाला परदेशातून ३०५ कोटी रुपये मिळाल्याच्या प्रकरणासह अनेक प्रकरणांत कार्ती चिदंबरम यांची चौकशी सुरू आहे.

Related Stories

गवतही उगवत नव्हते, आता फुलली फुले !

Patil_p

‘रेमडेसिवीर’ची उत्पादन क्षमता तिप्पट

datta jadhav

लसीकरणानंतर रक्तात गाठी होण्याचे प्रमाण झाले कमी

datta jadhav

निर्भया मारेकऱयांची आता नविन मागणी

prashant_c

गोवा विधानसभा निवडणूकीची तयारी सर्व मतदारसंघात सुरू

Sumit Tambekar

राष्ट्रपती भवन ६ फेब्रुवारीपासून नागरिकांसाठी पुन्हा खुले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!