कोटी रुपयांचे पेंटिंगचे साहित्य करणार सील
पाचगणी (सातारा) : महाबळेश्वर येथील वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा वाधवान यांच्यावर आरोप आहे. सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह वाधवान याच्या बांगल्यावर हजर झाले आहेत.
बंगल्यावरील परदेशी पेंटिंग्ज पोर्ट्रेट सील करून ताब्यात घेण्यात येणार आहेत ज्यांची किंमत कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.ते कुठून आले?कसे आणले याची शहानिशा सुरु आहे. महाबळेश्वर येथे पाच एकर परिसरात वाधवान याचा बंगला असून पहिल्या लॉकडाऊन मध्ये वाधवान बंधुनी तत्कालीन प्रधान सचिन राकेश गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता तेव्हापासून वाधवान बंधू ईडीच्या ताब्यात आहेत.