Tarun Bharat

दिल्ली पब्लिक स्कूल बेंगळूरकडे सीबीएसई फुटबॉल चषक

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

लव्ह डेल सेंट्रल स्कूल आयोजित सीबीएसई विभागीय स्तरीय 19 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली पब्लिक (पूर्व) बेंगळूरच्या संघाने येनापोया मंगळूर संघाचा 1-0 असा निसटता पराभव करुन सीबीएसई विभागीय स्तरीय चषक पटकाविला. तिसऱ्या स्थानावर डिपीएस (दक्षिण) बेंगळूर तर चौथ्या स्थानावर जेएसएस धारवाड समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत राज्यभरातून एकूण 56 सीबीएसई संघांनी सहभाग घेतला होता.  उपांत्य फेरीत लव्ह डेल सेंट्रल स्कूल, जैन इंटरनॅशनल स्कूल बेंगळूर, डीपीएस् स्कूल (उत्तर) बेंगळूर व अंगडी इंटरनॅशनल स्कूल यांना प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागली.

विजेत्यांना प्रमुख अतिथी नेहरू युवा केंद्राचे निवृत्त अधिकारी एस. यु. जमादार व प्राचार्य लक्ष्मी इंचल यांच्या हस्ते आकर्षक चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. दीपाली कुलकर्णी व शिल्पश्री ममदापूर यांनी सूत्रसंचालन केले. विनायक मोरे यांनी राष्ट्रगीत गायले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक बसू अगसगी, मतिन इनामदार, कलमेश एच., मंजुळा अगसर यांनी विशेष परिश्रम घेतले.

तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत 800 हून अधिक उत्कृष्ट फूटबॉलपटू सहभागी झाले होते. यामध्ये बेळगावसह बेंगळूर, म्हैसूर, गुलबर्गा, मंगळूर, उडुपी, दावणगेरे, विजापूर, मंड्या, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, चित्रदुर्ग, गदग, रायचूर, शिवमोगा, रामनगर, तुमकूर, हुबळी, धारवाड आदि ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Related Stories

उत्तरप्रदेशच्या रोहित रामाची खानापूर मॅरेथॉनमध्ये बाजी

Amit Kulkarni

महागाईसह भाजपविरोधात मुस्लीम बांधवांची निदर्शने

Amit Kulkarni

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या पतीचा मृत्यू

Amit Kulkarni

सरत्या वर्षाला बाय बाय!

Patil_p

पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

Amit Kulkarni

शिक्षक संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

Patil_p