प्रेसिडेंट्स चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित पेसिडेंट्स चषक 13 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सीसीआय संघाने एसीए ब संघाचा 10 गडय़ांनी तर एसकेई संघाने नीना संघाचा 6 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. आदित्य जाधव व आर्य एस. यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भुतरामहट्टी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एसीए ब संघाने 19.3 षटकात सर्व बाद 87 धावा केल्या. अमर पटवेगार व ओझस गडकरी यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. सीसीआयतर्फे आर्य एस.ने 5 तर श्रेया पोटेने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सीसीआय संघाने 10 षटकात बिनबाद 88 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. झोया काझीने नाबाद 30 तर वेदाना बी.ने नाबाद 25 धावा केल्या. त्यात 20 अवांतर धावांचाही समावेश होता.
दुसऱया सामन्यात नीना संघाने 20 षटकात सर्व बाद 80 धावा केल्या. फरहाजने 16 तर मनोजने 12 धावा केल्या. एसकेईतर्फे आदित्य व वेदांत यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेईने 17.1 षटकात 4 बाद 84 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. आदित्य जाधवने 30 तर सिद्धार्थ हेडाने 10 धावा केल्या. नीनातर्फे हमजाने 1 गडी बाद केला.