पोलीस अधिकाऱयांचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
शिवजयंती उत्सव मिरवणूक उत्साहात व शांततेत साजरी करण्याचे आवाहन मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी केले. शुक्रवारी मार्केट पोलीस स्थानकात शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व इतर अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱयांनी शिवजयंती मंडळांच्या पदाधिकाऱयांकडून मिरवणुकीसंबंधी माहिती घेतली. लवकरात लवकर मिरवणूक सुरू करावी. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला धक्का पोहोचू नये, असे आवाहनही यावेळी पोलीस अधिकाऱयांनी केले.