प्रतिनिधी /बेळगाव
उषःकाल मंडळाचे ज्ये÷ सदस्य कृष्णकांत उर्फ काका तेंडुलकर यांचा 84 वा वाढदिवस उषःकाल मंडळाच्यावतीने हॉटेल पॉपिन येथे साजरा करण्यात आला. यावेळी उषःकाल मंडळाच्या सदस्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
काका तेंडुलकर यांनी 84 वर्षांत पदार्पण केले. त्यांच्याबरोबर गेली 35 वर्षे आम्ही वॉकिंग करत आहे. काका हे दररोज 8 ते 10 कि.मी. वॉकिंग करत असतात. त्यामुळेच त्यांचे आरोग्य उत्तम आहे. आमच्या ग्रुपचे ते ज्ये÷ सदस्य आहेत. त्यांना दीर्घायुष लाभो अशा शुभेच्छा बाळासाहेब काकतकर देवून त्यांचा सत्कार केला.
यावेळी मधुकर सामंत यांनीही आपले विचार व्यक्त केले. उद्योजक महेश हणमशेठ यांनी शाल व पुष्पहार घालून काका तेंडुलकर यांचा सत्कार
केला.
यावेळी अरुण चव्हाण-पाटील, गजानन वेलंगी, नारायण किटवाडकर, शिवाजी हंगीरकर, रमेश हन्नीगिरा, बद्रीनाथ मिरजकर, आप्पा शेन्वी, सुहास किल्लेकर, प्रकाश एजरे, मिलिंद देशपांडे, अविनाश पाटील, शेखर हंडे, शिवाजी हंडे, नितीन दडकर, बी. एस. पाटील, युवराज चौगुले, श्रीकांत देसाई या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.