प्रतिनिधी / सलामवाडी : ( ता. हुक्केरी ) येथील भैरू व पार्वती पाटील यांनी सामाजिक बांधिलकी राखून आपला नातू रिवान याचा पहिला वाढदिवस शाळेमध्ये साजरा केला. त्यांनी अंगणवाडी, मराठी शाळा ते हायस्कूलच्या सर्व 230 विद्यार्थ्यांना स्वादिष्ट मेजवानी दिली. तसेच पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांना टॉय, बेल्ट, ओळखपत्र अशी शाळेला भेट म्हणून दिले.
रमेश पाटील म्हणाले, की वाढदिवस म्हंटला की सध्याची पिढी विनाकारण पैसा खर्च करते. त्यामध्ये सध्याचे बरेच तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन पार्ट्या करतात. त्यामुळे विनाकारण खर्च होतो. अशा काही नवीन युक्ति किंवा एक नवीन पर्याय म्हणून आपण शाळेला एक छोटीशी भेट दिली. त्यामुळे पुढील पिढीला किंवा विद्यार्थ्यांमध्ये चांगला संदेश जाईल.
यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक पेडणेकर, मराठी शाळेचे मुख्याध्यापक बी. ए. पाटील इतर शिक्षकवृंद, एसडीएमचे अध्यक्ष शिवाजी बुवा यांच्यासह कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.