होमहवन,मंत्रोच्चाराने वातावरणात सकारात्मकता
प्रतिनिधी / बेळगाव
पटवर्धन लेआऊट, वडगाव येथे पतंजलीतर्फे सुरू असलेल्या नि:शुल्क योग कक्षाचा वर्धापन दिन नुकताच मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून योगपीठाचे राज्य प्रभारी आरती कानगो व अमरेंद्र कानगो उपस्थित होते.
प्रारंभी होमहवन आणि मंत्रोच्चार झाले. आरती कानगो यांनी होमहवन किंवा अग्निहोत्र केल्याने वातावरणात बदलणारी सकारात्मकता आणि तिचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. योगसाधकांनी यावेळी सुंदर भजन सादर केले. गायत्री अडके यांनी साधकांकडून बौद्धिक खेळ करवून घेतले. नंदिनी चौगुले यांनी आभार मानले.