बेळगाव : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदकांच्या सामन्यात स्पेनचा पराभव करुन कांस्यपदक पटकाविले. या विजयाचा आनंदोत्सव येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकात हॉकी बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी मिठाईचे वाटप करुन जल्लोष करत साजरा केला. कांस्यपदकाच्या सामन्यात भारताने बलाढ्या स्पेन संघाचा 2-1 असा पराभव करुन कांस्यपदक पटकाविले. हॉकी बेळगावचे सचिव सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, पूजा जाधव, विनोद पाटील, मनोहर पाटील, नामदेव सावंत, माजी उपमहापौर संजय शिंदे, दयानंद कारेकर, श्रीकांत आसगावकर, संतोष दरेकर, संभाजी पावले, गणपत गावडे, प्रशांत मनकाळे, दत्तात्रय जाधव त्याचप्रमाणे खानापूर हायस्कूलच्या मुली व बेळगावमधील हॉकीपटू जल्लोष करताना उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ऑलिम्पिकपटू कै.बंडू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून फटाक्यांची आतषबाजी करुन उपस्थित नागरिकांना मिठाईचे वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला.
Previous Articleआयएसआयचे माजी प्रमुख हमीद संकटात
Next Article टिळकवाडी विभागीय क्रिकेट निवड चाचणी उत्साहात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.