शंभर कलाकार, शिल्पकार प्रात्यक्षिकाव्दारे देणार मानवंदना : शाहू मिलच्या हॉलमध्ये आयोजन
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमत्त आयोजत लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत रविवारी (दि. 24) सकाळी 9 वाजता 100 चित्रकार, शिल्पकार कला सादरीकरणातून मानवंदना देणार आहेत. शाहू मिल परिसरात मोठ्य़ा हॉलमध्ये एका छताखाली सर्व कलाकार एकत्र जमून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करणार आहेत. (centenary year memory of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी, बाबुराव पेंटर, भाई माधवराव बागल अशा अनेक दिग्गज चित्रकार, शिल्पकारांना राजाश्रय दिला. या महान कलाकारांनी कलासाधना करून एक स्वतंत्र अशी कोल्हापूर आर्ट स्कूल शैली निर्माण झाली. हीच परंपरा अखंडीत ठेवणारे कलाकार राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी ऐतिहासीक शाहू मिलमध्ये एकत्र येत आहेत. त्यामध्ये 100 जेष्ठ आा†ण नामवंत चित्रकार, शिल्पकार सहभागी होणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून, नागरिकांना ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी खुली असणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे .
या उपक्रमासाठी कॅमल कंपनीचे प्रायोजकत्व मिळाले असून सर्व कलाकारांना कॅनव्हास व रंग कॅमलने उपलब्ध करून दिले आहेत. दळवीज आर्ट इन्स्टिटय़ूट, कला निकेतन कला महाविद्यालय, कला मंदिर कला महाविद्यालय, कोल्हापूर आर्ट फाउंडेशन, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड, रंग बहार, कलासाधना यांच्यासह परिसरातील मान्यवर चित्रकार, शिल्पकार याच्या उत्स्फुर्त सहभागातून हा उपक्रम होत आहे. त्यानंतर या चित्राचे प्रदर्शन कृतज्ञता पर्वात शाहू मिल परिसरात होणार आहे.