Tarun Bharat

Corona; कोरोनामुळे अनाथ बालकांना केंद्र सरकारचा दिलासा

पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध योजनांचा प्रारंभ

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोनामुळे अनाथ झालेल्या तसेच विद्यार्थ्यांना मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठाच दिलासा दिला आहे. त्यांच्या हस्ते सोमवारी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) प्रदान करण्यात आली. तसेच कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठीही लाभदायक योजनेचा प्रारंभ करण्यात आला. कोरोना काळातही सरकारने निराशेला स्थान न देता आव्हानाचा स्वीकार केला. आज भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱया अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. कोरोना काळात भारत जगावर बोजा बनून राहिला नाही. तर त्याने या समस्यांवरचे उपाय जगाला दिले आहे, अशी भलावण त्यांनी आपल्या भाषणात केली.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केंद्र सरकारने विद्यार्थी आणि बालकांसाठी विभिन्न योजनांची घोषणा सोमवारी केली. या योजनेंतर्गत कोरोनामुळे आई-वडील गमावून अनाथ झालेल्या बालकांसाठी त्यांनी शिष्यवृत्ती हस्तांतरित केली. या बालकांना वयाच्या 23 व्या वर्षी 10 लाख रुपये मिळतील अशी तरतूद असणाऱया योजनेचाही पंतप्रधान मोदींनी शुभारंभ केला. या बालकांच्या नावे पैशांची ठेव ठेवली जाणार असून या बालकांच्या 23 व्या वर्षी त्यांना यातून प्रत्येकी 10 लाख रुपये मिळणार आहेत. या बालकांना निवारा आणि भोजन देण्याचीही योजना केंद्र सरकारने तयार केली आहे.

18 ते 23 वर्षांपर्यंत विद्यावेतन

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा कौशल्य शिक्षण घ्यायचे असेल तर यांना प्रतिमहिना 4,000 रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. तसेच 18 ते 23 या वयोगटातील अशा विद्यार्थ्यांना विद्यावेतही दिले जाणार  आहे. या मुलांसाठी एका विशेष हेल्पलाईनचाही प्रारंभ करण्यात आला आहे.

शेवटच्या नागरिकापर्यंत लाभ

सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भ्रष्टाचार आणि परिवारवादावर आमच्या सरकारने मात केली असून त्यामुळेच तळागाळातील जनतेपर्यंत लाभ पोहचविण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. पूर्वीच्या सरकारांच्या काळात कल्याणकारी योजना केवळ कागदावर बनत असत आणि कागदावरच राहत असत. आता तसे होत नाही. आता प्रत्येक योजनेचा लाभ तिच्या लाभार्थींपर्यंत नेण्यात येत आहे. हे परिवर्तन लोकांच्याही लक्षात आले आहे, असे प्रतिपादन याच कार्यक्रमात पक्षाध्यक्ष नड्डा यांनी केले.

सरकारच्या कामांचा आढावा पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर येण्याअगोदरच्या 67 वर्षांच्या काळात देशात 6.37 लाख प्राथमिक शाळा निर्माण करण्यात आल्या होत्या. तथापि, आमच्या सरकारच्या केवळ आठ वर्षांमध्येच 6.53 लाख प्राथमिक शाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशातल्या जवळपास 80 कोटी लोकांना विनामूल्य धान्य दिले जात आहे. किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱयांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचे मानधन दिले जात आहे. आतापर्यंत त्याचे 10 हप्ते देण्यात आले आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातही केंद्र सरकारची कामगिरी उत्तम आहे. अयोध्येत रामजन्मभूमीस्थानी भव्य राममंदिराची निर्मिती वेगाने होत आहे. काशी विश्वनाथ मार्गिकेचे कौतुक जगभरात होत आहे. सर्वच क्षेत्रात आठ वर्षांमध्ये केंद सरकारची कामगिरी प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Related Stories

नोकरी बदलल्यावर पीएफ ट्रान्सफरच्या त्रासापासून मुक्ती

Patil_p

अमरनाथ यात्रेला पुन्हा प्रारंभ

Patil_p

‘तोयबा’ दहशतवाद्याला बारामुल्लात कंठस्नान

Patil_p

विदेशातील भारतीय हे आमचे ‘राष्ट्रदूत’

Patil_p

आजारी आईला पाहण्यासाठी मोदीची रुग्णालयात धाव

Patil_p

जुन्या पेन्शन योजनेसाठी हरियाणात आंदोलनास्त्र

Patil_p