Tarun Bharat

तेल कंपन्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय ; २२ हजार कोटींचं अनुदान देण्याचा निर्णय

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारने (Central Government) तेल कंपन्यांना (Oil Companies) मोठा दिलासा दिला आहे. यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या तीन तेल मार्केटिंग कंपन्यांना एकरकमी अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.

तोट्यात असलेल्या तेल कंपन्यांना सरकारकडून मोठा दिलासा दिल्याची बातमी आहे. केंद्र सरकारने तेल मार्केटिंग कंपन्यांना एकरकमी अनुदान मंजूर केल्याने सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कपात करुन सर्वसामान्यांना दिवाळी भेट देणार असल्याच्या चर्चां आहेत. सरकारचे धोरण आणि वाटचाल त्याच दिशेने असल्याचा तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु पेट्रोल-डिझेलच्या किंमती जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही.

दरम्यान, केंद्र सरकारने तेल कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने तेल कंपन्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. महागड्या गॅसपासून ग्राहकांची सूटका व्हावी यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत मोदी सरकारने तेल कंपन्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. तेल कंपन्यांना एकरक्कमी २२ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे तेल कंपन्यांची नुकसान भरपाईची ओरड कमी होण्याची शक्यता आहे.

तर तोट्यात असतानाही या तिन्ही कंपन्यांनी देशभरात अत्यावश्यक स्वयंपाकाच्या इंधनाचा पुरवठा केला. यामुळेच सरकारने त्यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

Related Stories

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 85 लाखांवर

datta jadhav

पंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ ; चिक्की घोटाळा प्रकरणी अजून FIR का नाही? कोर्टाचा सवाल

Archana Banage

रामतीर्थजवळ सापडली मानवी कवटी; डीएनए चाचणी होणार

Archana Banage

काश्मिरी पंडितांवरिल हल्ला हे मोदी सरकारचे अपयश- खा.असदुद्दीन ओवेसी

Abhijeet Khandekar

महाराष्ट्र सत्तासंघर्ष ; २७ सप्टेंबरला पुढची सुनावणी

Archana Banage

लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवणार

datta jadhav