ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (chagan bhujbal) यांचे पुत्र पंकज भुजबळ (pankaj bhujbal) हे राज ठाकरेंच्या (raj thackeray) भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात असलं तरी राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात आहे. तर भेटीमागचं नेमकं काय कारण असावं याचे अंदाज बांधले जात आहेत. कालच्या सभेत राज यांनी छगन भुजबळांवर टीका केली होती. त्यामुळे आज लगेच पंकज भुजबळ राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी कालच्या ठाण्यातील उत्तर सभेत छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी पंकज भुजबळ हे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या दोघांमधील भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे.