हॉस्टेलचे कर्मचारी गंभीर जखमी
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथे महिलेची चेन पळवून नेत असताना चोरांनी 4 जणांवर गोळी झाडली आहे. हे चोर हॉस्टेल संचालिकेची सोन्याची चेन चोरून पळत होते. हॉस्टेलच्या कर्मचाऱयांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आता चोरांनी गोळीबार सुरू केला. हॉस्टेल संचालिका मीरा कुमारी यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. गोळीबारात हॉस्टेलचे कर्मचारी सोनू, अभिषेक, आशिष तसेच काजल हे जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चोरांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. याकरता सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले जात आहे.\