दुर्गादेवी कला व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजन
वार्ताहर /केपे
केपे येथील दुर्गादेवी कला व सांस्कृतिक मंडळातर्फे सभापती रमेश तवडकर व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, समाजसेवक व उद्योजक योगेश कुंकळय़ेकर, नगरसेवक अमोल काणेकर, प्रसाद फळदेसाई तसेच लक्ष्मण बोरकर, संदीप फळदेसाई, प्रेमानंद नाईक व इतर मान्यवर हजर होते.
गेल्या अनेक वर्षांपासून केपे पालिका क्षेत्रात सार्वजनिक दुर्गापूजन केले जात आहे. मात्र मागील दोन वर्षे कोविड मरामारीमुळे या उत्सवाचे आयोजन मोठय़ा प्रमाण होऊ शकले नव्हते. यंदा मंडळाने पुन्हा नेहमीप्रमाणे मोठय़ा स्वरुपात आयोजन केले होते. यात युवावर्गाबरोबर आबालवृद्धांचाही सहभात राहिला तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर गरबा, दांडिया नृत्यांचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी आपले कार्य असेच चालू ठेवावे, असे सभापती तवडकर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.