शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले : राजेश क्षीरसागर यांना अपक्ष निवडणुक लढण्याचे आव्हान
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिंदे गटासोबत गेलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी 2024®eer विधानसभा निवडणुक माझ्य़ा विरोधात अपक्ष म्हणून लढवावी, असे आव्हान शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी क्षीरसागर यांना दिले आहे. आपणही यावेळी अपक्ष लढू क्षीरसागरांपेक्षा मला किमान एक हजार मते ज्यादा देवून कोल्हापुरची स्वाभिमानी जनता मला विजयी करेल, असा विश्वासह यावेळी इंगवले यांनी व्यक्त केला.
जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शहरप्रमुख इंगवले बोलत होते.
हे ही वाचा : इंगवलेंवर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
इंगवले म्हणाले, राजेश क्षीरसागर यांचे स्वार्थी, स्वतःच्या फायद्याचे राजकारण कोल्हापुरच्या जनतेच्या समोर आले आहे. वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. त्यांना शिवसैनिकांसह कोल्हापुरची स्वाभिमानी जनता कधीही माफ करणार नाही. शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या विधानाचा विपर्यास करत त्यांना 2024 ला निवडून येवून दाखवा, असे वक्तव्य क्षीरसागर यांनी केले होते. मात्र मी ही त्यांना हेच आव्हान देतो की त्यांनीही 2024®³ee विधानसभा निवडणुकीत निवडून येवून दाखवावे. क्षीरसागर यांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जावे. मी ही अपक्ष म्हणूनच त्यांच्याविरोधात निवडणुक लढवतो. त्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे एक हजार मताने का होईना पण कोल्हापुरची जनता नक्कीच मला विजयी करेल, असा विश्वास इंगवले यांनी यावेळी व्यक्त केला.