क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत इंडियन बॉईज अ संघाने हिंडाल्को क्रिकेट क्लब अ संघाचा 5 गड्यांनी तर चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लब निपाणी संघाने सिग्निचर्स स्पोर्ट्स संघाचा 49 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या विनायक कांबळे, अमृत बिरोडकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात हिंडाल्को क्रिकेट क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 16.1 षटकात सर्व गडी बाद 59 धावात आटोपला. इंडियन बॉईजतर्फे अमृत बिरोडकरने 8 धावात 3, शंकर होसमनीने 10 धावात 3 तर अरबाज जमादार, फुर्कान मुल्ला यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन बॉईजने 16.5 षटकात 5 गडी बाद 60 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात किरण यलगुरकरने 16, सर्फराज मुरगुडने नाबद 14 तर शारुखान देसाईने 13 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात चॅलेंजर्स युथ स्पोर्ट्स निपाणी संघाने प्रथम फलंदाजी करताना 29 षटकात 8 गडी बाद 173 धावा केल्या. त्यात ओम मातीव•रने 1 षटकार 6 चौकारासह नाबाद 57, विनायक कांबळेने 6 चौकारांसह 36, धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्निचर स्पोर्ट्स क्लबचा डाव 23 षटकात 124 धावात आटोपला. चॅलेंजर्सतर्फे प्रथमेश लोहारने 18 धावात 3, विनायक कांबळेने 25 धावात 3, संदेश पाटीलने 31 धावात 3, अनिकेत लोहारने 1 गडी बाद केला.