Tarun Bharat

पुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता

Advertisements

आज-उद्या 60 किमी वेगाने वादळाचा धोका : हवामान खात्याचा मच्छिमारांना इशारा

प्रतिनिधी /पणजी

राज्यात रविवारी राजधानीसह अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पेडणे पासून काणकोणपर्यंत जवळजवळ सर्वच भागात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक सखल भागात पाणी साचून वाहतुकीची कोंडी झाली. राज्यात पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहणार असून गडगडाट, वीज आणि जोरदार वादळी वाऱयासह मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

शुक्रवारी रात्री सुरू झालेला पाऊस शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जोरदार बरसला. तरीही रविवार सुट्टीचा दिवस असल्याने विद्यार्थी तसेच नोकदारवर्गाला याची तेवढीशी झळ बसली नाही. तरीही अद्याप पावसाळी साहित्याची खरेदी न केलेल्यांची बहुतेक बाजारपेठात गर्दी दिसत होती. सावर्डे साप्ताहिक बाजारात लोकांची मोठी गर्दी दिसत होती.

दरम्यान, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसही राज्यात अशीच स्थिती राहणार असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱयासह अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्मयता आहे. त्यामुळे खास करून मच्छिमार बांधवांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

दोन्ही जिह्यात तसेच उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी भागात पश्चिम मध्य अरबी समुद्राला लागून असलेला नैऋत्य अरबी समुद्रात 12 ते 16 जून दरम्यान प्रतितास 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असून प्रसंगी त्याचा वेग 60 किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ईशान्य अरबी समुद्र आणि लगतचा दक्षिण गुजरात किनारी भागात आज आणि उद्या 60 किमी एवढय़ा वेगाने वारे वाहणार असून मुसळधार पाऊसही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी उपरोक्त काळात दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनाऱयालगत आणि बाहेर जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

वरील काळातच कर्नाटक किनारपट्टी तसेच उत्तर केरळ किनारा, लक्षद्वीप आणि दक्षिणपूर्व अरबी समुद्राच्या लगतच्या भागात प्रतितास 60 किमी वेगाने वारे वाहणार असून जोरदार पावसाची शक्मयता वर्तविण्यात आली आहे.

Related Stories

खुल्या बाजारातून वीज खरेदीस हिरवा कंदील

Amit Kulkarni

नितिन गडकरी यांच्याहस्ते ‘टेलेमेडिसीन’चे उद्घाटन

Amit Kulkarni

सर्व शाळांमध्ये लवकरच ‘व्हर्च्युअल क्लासरूम’

Amit Kulkarni

एटीएमद्वारे पैसे चोरणाऱया चोरटय़ांना म्हापशात अटक

Patil_p

दीड दिवसांच्या गणरायाला निरोप

Patil_p

सासष्टीत 33 पंचायतीतून 863 उमेदवार

Amit Kulkarni
error: Content is protected !!