Tarun Bharat

गुजरात निवडणुकीनंतर राज्यपालांची उचलबांगडी?

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्यभर टीकेचे धनी ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याविरोधात केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. राज्यपालांच्या वक्तव्याने स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसू शकतो. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

5 डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडेल. त्यानंतर 19 डिसेंबरपासून राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी राज्यपालांविरोधात संघटितपणे जोरदार आवाज उठवणार आहे. राज्यपालांच्या निषेधाचा ठराव या अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून केंद्राकडून राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी केली जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

अधिक वाचा : दक्षिण, मध्य, वायव्य भारतात थंडी जास्त

राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातील जनतेच्या मनात संतप्त भावना आहेत. राज्यभर कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध होत आहे. भाजपचे खासदार आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही आपली उघड नाराजी व्यक्त करत राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे या विषयात शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून येते.

Related Stories

चांदणी चौक पूल पडताना मुंबई-बेंगळूर महामार्गावरील पुणे शहरातील वाहतूक बंद रहाणार

Archana Banage

”मोदी निर्भयाच्या कुटुंबाला भेटल्याचे फोटो प्रसिद्ध झाले मात्र राहुल गांधींना पीडित कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी पत्र”

Archana Banage

महाबळेश्वर सुशोभिकरणाचा आराखडा नव्याने तयार होणार

Patil_p

सुविधांची वाणवा मात्र कर आकारणीचा फतवा

Patil_p

मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; पंचायत निवडणुका रद्द

Abhijeet Khandekar

ट्रम्प यांच्यावरील ‘त्या’ वादग्रस्त पुस्तकाचा पहिल्याच दिवशी विक्रमी खप

datta jadhav