12200 रूपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/चंदगड
इनाम सावर्डे येथील सागर निंगाप्पा पाटील (वय.37) याने बारा बोअरची बंदुक तसेच एक जीवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी चंदगड पोलीसात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे सहाय्यक फौजदार चंदू नन्नवरे यांनी फिर्याद दिली आहे.
गुरूवारी सायंकाळी 4 वाजता सागर निंगाप्पा पाटील हा आपल्या घरासमोर विनापरवाना बेकादेशिर बारा बोअरची बंदुक तसेच बारा बोअरचे 1 जीवंत काडतूस असा एकूण 12200 रूपये किंमतीचा मुद्देमाल जवळ बाळगलेला मिळून आल्याने त्याच्यावर भारतीय हत्त्यार कायदा कलमान्वये 3 (1) 25 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक शेष मोरे, सहाय्यक फौजदार चंदू नन्नवरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय वाडेकर, पोलीस नाईक तुकाराम राजीगरे, ओंकार परब, अनिल जाधव करीत आहेत.