Tarun Bharat

…नाहीतर घरं-दारं विकायची वेळ येईल, चंद्रकांत पाटलांचा केंद्रासह-राज्याला सल्ला

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

अगोदर रस्ते चांगले नव्हते. रस्ते चांगले झाल्यावर गाड्या पळत नव्हत्या. आत गाड्या आणि रस्तेही चांगले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला जातो. मात्र आता गाड्यांना स्पीड लिमिट लावलं जाते. हे लिमिट वाढवण्याची गरज आहे. नाहीतर अशा दंडामुळे घरं दारं विकायची वेळ येईल, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केंद्रासह राज्य सरकारला दिला. ते कोल्हापुरात बोलत होते.

वर्षभरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) होतील. असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी आजरा येथे केले होते. त्यावर आज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी आशावाद व्यक्त केला आहे. माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल आशावाद व्यक्त करणे यात काय चूक आहे? असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

गेल्या काही दिवसात राज ठाकरे (raj thackeray) यांच्या सभेवरून राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्या सभेला परवानगी मिळावी नव्हती. आता सभेला परवानगी मिळाली आहे. पण राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नसती तरी ही सभा झालीच असती. राज ठाकरे यांचे अस्तित्व धोक्यात येईल असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत, त्यांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी. त्यांनी राज ठाकरे यांची चिंता करण्याची गरज नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. राज्य ठाकरे भाजपचा अजेंडा राबवत असे कोण म्हणत असेल तर चांगले आहे. उद्या बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी भाजपचं अजेंडा राबवला तरी आम्ही त्यांचे स्वागत करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या भूमिकेवरून भविष्यात किंवा मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे युतीची चर्चा आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याना विचारले असता, त्यांनी मनसे सोबत युती करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड भरला आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचा समाचार घेतला आहे. बातम्या कमी झाल्या की तुम्ही काहीही बातम्या चालवता. कोल्हापूर- पुणे महामार्गावर अनेक कॅमेरे लावले आहेत. त्यावेळी थोडा वेळ वाढला की लगेच दंड केला जातो. मी देखील आज साडेबारा हजारांचा दंड भरला आहे. त्यामुळे कशाचाही बातम्या होतील असे करू नये. असा सल्ला पाटील यांनी दिला.

राजद्रोह या कलमाचा गैरवापर थांबवावा, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मी पवार यांच्या मताशी सहमत आहे. राजद्रोह, देशद्रोह गुन्हा कशाही वेळी लावला जातो. मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा संकल्प हा राजद्रोह कसा होऊ शकतो? सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून हे संपवलं पाहिजे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Related Stories

कर्नाटक सरकारने माजी मंत्र्यांवर दाखल केला गुन्हा

mithun mane

कर्नाटक : एसएसएलसी परीक्षा पुढे ढकलल्या

Archana Banage

…तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती- संजय राऊत

Archana Banage

डोक्यात कुऱहाड घालून पत्नीचा निर्घृण खून

Patil_p

अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट ; दिला ‘हा’ सल्ला

Archana Banage

महाराष्ट्रात वाहतूक दंडात वाढ; नवी अधिसूचना जारी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!