Chandrakant Patil On Mahavikas Aaghadi :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)हे लोकाभिमुख विचार करतात याला जनतेने त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिलं.पण बँकांनी आपला एनपीए कमी करण्यासाठी त्याचा वापर केला तर लोकांच्या हितासाठी घेतलेला निर्णय व्यवहारात येत नाही, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी दिली. आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला
यावेळी बोलताना ते म्हणाले, भूविकास बँकेचे कर्ज माफ केलं पण पवार साहेबांनी बँक इतक्या वर्ष आधीच बंद झाली असं वक्तव्य केलं.पण शेतकऱ्यांच्या सातबारावर भूविकास बँकेचा असलेला शिक्का रिकामा करण्याचे काम त्यांनी केलं.राज्यातील 63 हजार शेतकऱ्यांच्या सातबारावर असणारा शेरा पुसण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि सातबारा कोरा केला. यावेळी चंद्रकांत पाटलांनी आरोप केला.
अधिक वाचण्यासाठी- कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा बंद, प्रवाशांची गैरसोय होणार
मागील सरकारच्या काळात असा निर्णय का नाही झाला ?
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यभर दौरा करत आहे. यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या वक्तव्यावर शेतकरी हसले, उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. तुमचं सरकार होतं त्यावेळेला शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना अस्वस्थ केलं. शेतकऱ्यांना 25000 मिळाले पाहिजे पण ते मिळालं नाही.पण आताच्या सरकारनं शेतकऱ्यावर जे जे संकट आलं त्या त्या वेळेला मदत केली आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई डबल दिली.शेतकऱ्यांना पन्नास हजार का लाख रुपये द्यायला पाहिजे होते तुमच्या काळात असा का निर्णय घेतला नाही असा सवाल यावेळी केला.
भाजप,मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना युती होणार?
राज्यपालांची भेट कोणीही घ्यावी लोकशाहीत कोणीही कुणाला अडवलेलं नाही असा टोला नाना पटोले (Nana Patole) यांना लगावाला. पुढे बोलताना ते म्हणाले, भाजप,मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची महाविकास आघाडी असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.असा प्रस्ताव असेल तर महाराष्ट्रात भाजपचे तेरा कोर कमिटीचे सदस्य बसून निर्णय करतात.अशा विषयासाठी कोर कमिटीची कोणतीही बैठक झालेली नाही.असा कोणताही प्रस्ताव चर्चेला आला नाही,त्यामुळे ज्या प्रस्तावाची चर्चाच नाही त्या प्रस्तावाबद्दल मी काय बोलणार असं स्पष्टीकरण आघाडी बद्दल दिले.
LIVE पाहण्यासाठी येथे क्लिक करा : कोल्हापुरातून मंत्री चंद्रकांत पाटील लाईव्ह, पहा काय म्हणाले?
नवीन सरकारच्या निर्णयाने सर्वसामान्य माणूस समाधानी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही,असा संकल्पच शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai)यांनी काल केला. त्यांच्या या वक्तव्या संदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य खरच आहे. कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेत असलेल्या निर्णयाबद्दल सर्वसामान्य माणूस समाधानी होत आहे.पंधरा वर्षेच नाही तर हे सरकार पुढील अनेक वर्ष शिवसेना भाजपचे राहील असेही ते म्हणाले.


previous post
next post