Tarun Bharat

BJP Maharashtra: भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष ठरले; ‘या’ नेत्यांची लागली वर्णी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यांनतर भाजपने महाराष्ट्रातील कार्यकारिणीत काही बदल केले आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानं हे पद रिक्त झालं होतं, त्याजागी आता बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा भाजपकडून लवकरच करण्यात येणार आहे. (Chandrasekhar Bawankule BJPs new Maharashtra state president)

पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विधान परिषदेतील सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केलं आहे. तर आशिष शेलार यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.” चंद्रकांत पाटील हे कॅबिनेट मंत्री झाल्याने प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची नियुक्त करण्यात आली आहे. भाजपकडून याबाबत संध्याकाळी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व, तसंच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. भाजप महाराष्ट्रातला नंबर वन पक्ष आहे, तो आणखी पुढे कसा नेता येईल, शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करेन.”

Related Stories

पुलाची शिरोलीत रुग्ण संख्या वाढल्यास ग्रामपंचायत कोविड सेंटर उभा करणार

Archana Banage

पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपती मंडळांनी घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

5.82 लाख शेतकऱ्यांनी भरली 511 कोटी रुपयांची थकबाकी

Tousif Mujawar

चिनी सैन्यांकडून पाच भारतीयांचे अपहरण

datta jadhav

दुहेरी जलवाहिनीमुळे ऊस उत्पादनावर परिणाम

Patil_p

मनसेचे वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर !

Archana Banage