Pankja Munde : भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत.कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं.ती माझी जबाबदारी आहे,मी काही उपकार केलेले नाहीत.पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत.त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत.त्यामुळे त्यांना नंतर बोला,मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होता अस मत चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी नमूद केलं आहे.आज माझ्याकडे कोणतंही पद नाही.आमचा सुखाचा संसार चालू द्या, आम्ही लोक मिळून आमचा जिल्हा चांगला सांभाळतो, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं. यानंतर मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चेला उधान आलं होतं. यासंदर्भात बावनकुळेंनी फ्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कधीच थांबला नाही पाहिजे.आपल्या जिल्ह्यातील शिस्त आता बिघडवू द्यायची नाही.जिल्ह्याची घडी बसवण्यासाठी जिल्ह्याच्या मातीतील माणूस लागतो.बाहेरच्या लोकांनी जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये.बीड जिल्ह्याच्या मतांमुळे महाराष्ट्राच्या विकासालाा मोठा फरक पडतो,सत्तेतील मंत्र्यांनी जिल्ह्याला भरभरून द्यावं,अशी अपेक्षा आहे.आमज माझ्याकडे कोणतंही पद नाही.आमचा सुखाचा संसार चालू द्या,आम्ही लोक मिळून आमचा जिल्हा चांगला सांभाळतो,’असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं.


next post