Tarun Bharat

नागपंचमीमुळे पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल

शिराळा /वार्ताहर

शिराळा येथील नागपंचमी यात्रा दिनांक ३ ऑगस्ट २०२२ रोजी साजरी होणार असून या दिवशी शिराळा येथे नागपंचमी यात्रा मोठ्या प्रमाणात भरविली जाते.नागपंचमी दिवशी शिराळा येथील वाहतूक सुरळीत रहावी तसेच गर्दीत वाहन घूसून नागरिकांच्या जीवितास धोका पोहचू नये याकरिता सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम ३४ प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात दि. २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत खालीलप्रमाणे बदल केला आहे.

पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात केलेला बदल पुढीलप्रमाणे असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.४ पेठनाका येथून सर्व वाहने एकेरी मार्गाने शिराळ्याकडे जातील. शिराळ्याकडून राष्ट्रीय महामार्ग ४ कडे जाणारी सर्व वाहने शिराळा बायपासमार्गे कापरी-कार्वे-ढगेवाडी फाटा-ऐतवडे बुद्रुक फाटा-लाडेगाव-वशी-येडेनिपाणी फाटा या मार्गाने महामार्ग क्र. ४ कडे जातील. तसेच शिराळा बायपास येथून पेठनाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १३१ प्रमाणे शिक्षा किंवा दंड करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

ब्रह्मनाळमध्ये कार पेटवण्याचा प्रयत्न

Archana Banage

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत सांगली महापालिका राज्यात अव्वल

Archana Banage

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी तीन दिवसांनी वाढविला

Archana Banage

सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत नोकरी लावण्यासाठी सोने,रोख रक्कमेची फसवणूक

Archana Banage

सांगलीत इलेक्ट्रिक बस सुरु करा मदत करतो; नितीन गडकरी

Archana Banage

मुसळधार पावसाने माणगंगा नदी दुथडी वाहू लागली

Archana Banage