प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱयांची बदली करण्यात आली आहे. महसूल विभागातील विविध कर्मचाऱयांच्या जबाबदाऱयांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या मालमत्तांची माहिती ठेवणाऱया इस्टेट ऑफिसर असलेल्या डी. जे. कोरी यांच्याकडे झोपडपट्टी निर्मूलन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विविध विभागात काम करणाऱया कामगारांना दुसऱया विभागात बदली करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. महापालिका कार्यालयीन कामकाजात सुसुत्रता आणण्यासाठी बदली करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कोणतीच तक्रार नसताना कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्याने मनपा कार्यालयात चर्चेचा विषय बनला आहे.
कर्मचाऱयाचे नांव | सध्या कार्यरत असलेले विभाग | बदली करण्यात आलेला विभाग |
डी. जे कोरी, इस्टेट ऑफिसर | महसूल विभागाचे इस्टेट अधिकारी | सध्या असलेल्या कार्यभारासह झोपडपट्टी निर्मूलन विभागाची प्रभारी जबाबदारी |
संजय एस. पाटील, | वॉर्ड क्रमांक 33 आणि 40 करवसुलीदार व महसूल निरीक्षक | वॉर्ड क्रमांक 33 करवसुलीदार व वॉर्ड 33 आणि 37 चे महसूल निरीक्षक |
श्रृती चलवादी | वॉर्ड क्रमांक 47 करवसुलीदार व वॉर्ड क्रमांक 41 ते 48 च्या महसूल निरीक्षक | वॉर्ड 43 चे करवसुलीदार व वॉर्ड 38 ते 43 च्या महसूल निरीक्षक |
महादेव गुंजीगावी | महसूल विभागातील मालमत्ता कर विभागाची आणि बांधकाम परवानगी संबंधीत घरपट्टी चाचपणी करणे | वॉर्ड क्रमांक 44 चे करवसुलीदार आणि वॉर्ड क्रमांक 44 ते 50 चे महसूल निरीक्षक |
विनोद जायण्णावर | वॉर्ड क्रमांक 6 आणि 7 चे करवसुलीदार | वॉर्ड क्रमांक 7 चे करवसुलीदार |
सागर कांबळे | वॉर्ड क्रमांक 11 आणि 12 चे करवसुलीदार | वॉर्ड क्रमांक 5 आणि 6 करवसुलीदार |
अनिल डी. देसाई | वॉर्ड क्रमांक 15 चे करवसुलीदार | वॉर्ड क्रमांक 15 व 23 चे करवसुलीदार |
गुंडप्पा काखंडकी | वॉर्ड क्रमांक 22 चे करवसुलीदार | वॉर्ड क्रमांक 21 व 22 चे करवसुलीदार |
लक्ष्मण धावण्णावर | वॉर्ड क्रमांक 5 चे करवसुलीदार | वॉर्ड क्रमांक 11 आणि 12 चे करवसुलीदार |
भरत कोलकार | वॉर्ड क्रमांक 43 आणि 44 चे करवसुलीदार | वॉर्ड क्रमांक 47 चे करवसुलीदार |
रामणप्पा दोडमनी | वॉर्ड 38 व 39 चे करवसुलीदार | वॉर्ड क्रमांक 38, 39 व 40 चे करवसुलीदार |
शैला नायकर | विद्युत विभाग | विद्युत शाखेतील कामकाजाबरोबरच महसूल विभागातील मालमत्ता कर आणि बांधकाम परवानगी संबंधीत मालमत्ता कर तपासणी |